चोपडा तालुक्यातील नागलवडी येथे अज्ञात चोरट्यांच्या धुमाकूळ एकाच रात्री सहा घरे फोडली रोकड सह सोन्याचे दागिने लंपास

नागलवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी सहा घरे फोडली,रोकड सह सोन्याचे दागिने लंपास

चोपडा:-(प्रतिनिधी सचिन जायसवाल)
नागलवाडी ता चोपडा येथे बंद असलेली सहा रहिवासी घरे अज्ञात चोरट्यानी फोडून कपाटातील रोकड व सोने चांदीचे दागिने असा लाखोचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना दि १२ च्या मध्यरात्री नंतर घडली.या घटनेमुळे नागलवाडी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


नागलवाडी येथील शांताराम दौलत पाटील,मनोज पुंडलिक चौधरी,गंगाधर एकनाथ बेलदार,गोपाळ गुलाबसिंग चौधरी, दीपक चंद्रसिंग राजपूत यांची रहिवासी घरे कामा निमित्ताने बाहेर गावी गेल्याने घरे बंद होती.तसेच रात्र असल्याने पोस्ट ऑफिस देखील बंद होते या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी वरील पाच रहिवासी घरांचे व पोस्ट ऑफिसचे कुलूप तोडून कपाटातील रोकड व सोने चांदीचे दागिने असा लाखोचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना दि १२ च्या मध्यरात्री नंतर घडली.यात शांताराम दौलत पाटील हे कामानिमित्त पाळधी येथे मुलाकडे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते त्यांनी पाळधी येथे मुलाला घर घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये कर्ज घेतले होते.सदर कर्जाची रक्कम व हातातील वीस हजार रुपये रोख असे एक लाख रुपये व १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन,५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत,३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल,५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत,५ ग्रॅम वजनाचे लहान मुलांच्या गळातील पदक असे एकूण २८ ग्रॅम सोने व ४ तोडे चांदीचा करदोडा असा लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून लंपास केला.
याबाबत शांताराम दौलत पाटील वय ७२ रा नागलवाडी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम ३८०,४५४,४५७ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र सोनवणे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More