महसूल प्रशासन कोमात तर पोलिस प्रशासन जोमात #तापी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू भरतांना ट्रॅक्टर पकडले… तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

महसूल प्रशासन कोमात तर पोलिस प्रशासन जोमात #तापी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू भरतांना ट्रॅक्टर पकडले… तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


एकीकडे महसूल विभाग वाळू तस्करीवर अंकुश लावण्यात असमर्थ दिसत असताना मात्र सहा. पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले चोपड़ा भाग चोपडा व गाडी चालक पोकॉ तुषार मधुकर साळुंखे यांचे सह नाकाबंदी व कोबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलींग करीत असताना कृषिकेश रावले ( पोलिस उपविभागीय अधिकारी ) यांना गुप्त बातमी मिळाल्याने सहा. पोलीस निरीक्षक संदिप दुनगहु आपल्या स्टाफ सह त्यात किशोर शिंदे, पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, लिलाधर भोई, चालक पोहेकॉ किरण धनगर असे तापी नदि पात्रात निमगव्हाण गावाच्या बाजुला तापी नदि पात्रात गेले असता त्यांना रात्री दीड वाजता एक ट्रॅक्टर वाळु भरतांना आढळून आले.

त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी सिताराम हिरामण बाविस्कर रा.तांदलवाडी ता.चोपडा ,पंकज माणिक सोनवणे रा. निमगव्हाण ता. चोपडा , नितिन भगवान बाविस्कर रा. निमगव्हाण ता. चोपडा असे सांगितले. ट्रॅक्टर क्रमांक MH19 BG 2635 असा असून , निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर असुन त्यास निळ्या रंगाची ट्रॉली त्यात सुमारे दिड ब्रास वाळु भरलेली आढळून आली आहे.


सुमारे 400000/- रू किंमतीचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व 100000/- रू किमतीची निळ्या रंगाची विना नंबरची ट्रॉली तसेच 4500/- रू किंमतीची दिड ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर घटनेचा जागीच पंचनामा करण्यात आला असून सिताराम हिरामण बाविस्कर रा. तांदलवाडी ता. चोपडा ,पंकज माणिक सोनवणे रा. निमगव्हाण ता. चोपड़ा व नितिन भगवान बाविस्कर रा. निमगव्हाण ता. चोपडा या तिघांविरुद्ध रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More