मोटार सायकलच्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार… शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

मोटार सायकलच्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार… शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा शहरांतील मच्छी मार्केट भागात मोटार सायकलच्या वादातून दोन तरूणात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाल्याने एकाने धारदार शस्त्राने मागून वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.


सविस्तर वृत्त असे की, जगदिश शिवाजी पाटील हे त्यांची मालकीची मोटार सायकल क्रमांक एम एच एल . १९. एबी -१२५४ हया मोटार सायकलने मच्छी मार्केट कडुन कृषी उत्पन्न बाजारसमिती चोपडा कडेस जात असतांना आरोपी फैज्या ( पूर्ण नाव माहीत नाही ) हा त्याची मोटार सायकल समोर आल्याने जगदिश शिवाजी पाटील यांनी आरोपी फैज्या यास रस्त्याचे बाजुला चाल असे बोलला.असे बोलण्याचा फैज्या यास राग आल्याने आरोपी फैज्या याने जगदिश शिवाजी पाटील यास शिवीगाळ करून, धक्का बुक्की केली तसेच जवळ असलेल्या त्याच्या मालकीच्या चिकन दुकानावर धावत जावून धारदार शस्त्र घेवून येवून जगदिश शिवाजी पाटील यांच्या पाठीमागील बाजूस कमरेजवळ धारदार शस्त्र मारुन दुखापत केली म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा द वि कलम ३२४, ३२३ ,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना संतोष पारधी करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More