माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेला शैक्षणिक साहित्य भेट.#
मुख्याध्यापक एस,पी,पवार उपक्रमशील…

माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेला शैक्षणिक साहित्य भेट.
मुख्याध्यापक एस,पी,पवार उपक्रमशील.


चोपडा:-प्रतिनिधि. चोपड़ा तालुक्यातील वर्डी या सातपुड़ा शिक्षण संस्था भुसावळ संचलीत खाजगी प्राथमिक शाळा वर्डी येथे माजी विद्यार्थ्या मार्फ़त शाळेला एल ई ड़ी स्मार्ट टी.व्ही व प्रिंटर भेट दिले असुन आठ ते दहा माजी विद्यार्थी एकत्र येवून ही भेट दिली असुन,ज्या शाळेने आम्हाला घड़वीले,ज्या शिक्षकांनी आम्हाला संस्कार दिले,व स्वतःच्या पायावर उभे केले,अश्य्या गुरुजनांचे व शाळेचे आम्ही देणे लागतो,म्हणून आम्ही ही संकल्पना राबविली,अजूनही मोठी मदत आम्ही करु अस त्यांनी म्हटले.


कोरोनाच्या काळात घरी बसुन सर्वच विद्यार्थ्यानी 2वर्ष शिक्षण घेतले, सद्या डिजिटल युग असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण मिळाले पाहीजे, ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही ही संकल्पना राबविली अस ही ते म्हणाले.या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यकमाचे अध्यक्ष स्थानी माध्यमिक चे चेअरमन हरिश्चंद्र शामराव चव्हाण होते तर खाजगी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष पं.स.चे माजी सभापती विनायकराव चव्हाण होते.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाही चे पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन एस.पी.पवार मुख्याध्यापक यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार ही यावेळी शाल बुके देवून करण्यात आला.यावेळी गावातील जेष्ठ महिला व एस, पी,पवार यांच्या मातोश्री यशोदाबाई प्रताप पवार,संचालीका भारती मोहन चव्हाण,माध्यमिक चे मुख्याध्यापक एस,व्ही,पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आणि माजी विद्यार्थी ललीत यशवंत पाटील,समाधान पाटील,अनिल सुखदेव पाटील, संजय पंडित पाटील, दीपक लीलाधर चव्हाण,गोकुळ पाटील,नितिन गोरख पाटील, प्रदीप अशोक पवार,दगडू बाबूराव कोळी,प्रमोद प्रतापसिंग चव्हाण, नीता सोनार,सुनयना चौधरी, प्रियंका अग्रवाल,अर्चना देवानंद शिंदे,उज्ज्वला चव्हाण यांची उपस्थिति होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More