समाजकंटकांनी केलेल्या कृतीचा जाहीर निषेध..# चोपडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.)तर्फे निवेदन

समाजकंटकांनी केलेल्या कृतीचा जाहीर निषेध..# चोपडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.)तर्फे निवेदन

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

चोपडा (प्रतिनिधी):- नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली गावात दलित अक्षय मातराय यांनी पुढाकार घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात काढल्याने जातीयवादी समाजकंटकांनी मनात जातीयद्वेशातून जातीपासून दि.१ जून २०२३ रोजी अक्षय भालेराव यांची भोसकून हत्या करण्यात आली हत्या करणाऱ्या समाजकंटकांना फाशी झाली पाहिजे व बोंडार हवेली गावाची ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रूप ग्रामपंचायत ला जोडण्यात यावे तसे सरपंच व पोलिस पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला५० लाखाची आर्थिक मदत यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी दयावी तसेच हिना मेश्राम या बौद्ध तरुणीची सावित्रीबाई फुले मागासवर्गीय वस्तीगृह मुंबई येथे बलात्कार करून हत्या आली त्यानंतर बलात्कार करणाऱ्यांने आत्महत्या करून घेतली वस्तीगृहात अधिक्षक गैरहजर, गृहपाठ गैरहजर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.ह्या आशयाचे निवेदन चोपडा तहसीलदार यांना देण्यात आले . या झालेल्या घटनेच्या चोपडा तालुक्यातून जाहीर निषेध करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष भिवराजदादा रायसिंगे,विनोद बडगुजर तालुका युवा अध्यक्ष,संदीप थोरात,भिमसिंग जोशी, महेंद्र करंकाळे ,महेश पाटील,रोहिदास अहिरे आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More