चोपडा पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून कोऱ्या शिधा पत्रिका नसल्यामुळे गोर गरीबांचे होता हाल .. # राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष नईम शेख
चोपडा तालुक्यातील आपल्या पुरवठा कार्यालयात कोऱ्या केशरी शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत त्याबाबतीत चोपडा तालुक्यातील गोरगरीब जनतेला व शेतकरी वर्गाला तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना रेशन कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी पुरवठा विभागाकडे अर्ज येतात तसेच कोरोना महामारीमुळे जनता आधी त्रस्त झालेल्या आहे बऱ्याच लोकांना महागाई बेरोजगारी यासारख्या समस्यांमुळे महागडे धान्य घेणे परवडत नाही


त्यासाठी तालुक्यातली जनता केसरी शिधापत्रिका उपलब्ध करण्यासाठी आपल्याकडे अर्ज करीत असते परंतु मागील सहा महिन्यापासून असे निदर्शनास येत आहे की लोकांना शिधापत्रिका घेण्यासाठी वारंवार पुरोठा विभागाचा कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे या संदर्भात राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता आपल्या कार्यालयात कोऱ्या रेशन कार्ड उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे तरी वैद्यकीय व शैक्षणिक कामासाठी शुभ्र कार्ड तुमच्या कार्यालया तून देण्यात येत आहे आणि तसेच महिलांना दुय्यम प्रत साठी फेर अर्ज सादर करावं लागत आहे त्या कामासाठी महिलांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तरी या संदर्भात जातीने लक्ष घालून केशरी कोऱ्या शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून गोरगरीब जनतेला आपल्या कार्यालयातील हेलपाटे घालावे लागणार नाही. याआशयाचे निवेदन चोपडा तहसीलदार गौरी धायगुडे यांना देण्यात आले या वेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी युवक तर्फे युवक शहराध्यक्ष समाधान माळी युवक तालुका उपाध्यक्ष नईम शेख मोसिन अली हैदर अली जावेद मिर्झा व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.













