चोपड्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ  शिवनेरी अपार्मेटच्या पार्किंग मधून २ दुचाकी घेऊन चोरटे पसार # घटना सीसी टीव्हीत कैद …

चोपड्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ  शिवनेरी अपार्मेटच्या पार्किंग मधून २ दुचाकी घेऊन चोरटे पसार # घटना सीसी टीव्हीत कैद …

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

चोपडा शहरातील ऑक्सपर्ड शाळे जवळील शिवनेरी अपार्मेटच्या पार्किंग मधून दि.५रोजी सकाळी १० वाचे सुमारास शिवनेरी अपार्मेटच्या पार्किंग मधून तीन अज्ञात चोरटे तोंडावर रुमाल बांधून दोन दुचाकी चोरून नेतानाची घटना घडली आहे .घटना  अपार्मेटच्या सी सी टीव्ही मधे कैद झाली आहे .


फिर्यादी राजेंद्र नारायण यांनी दिलेल्या फिर्यादीत शिवनेरी अपार्मेटच्या पार्किंग मधून तीन अज्ञात चोरट्याने तोंडावर रुमाल बांधून  हिरो युनिकॉन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र. एम. एच १९सी.पी. ८१५४, बजाज पल्सर कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली मोटार सायकल क्र. एम एच १९ डी एस ७९७९ दोन्ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More