महिलांना अपमानास्पद वागणुक देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करा; निळे निशाण सामाजिक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी # येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

महिलांना अपमानास्पद वागणुक देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करा; निळे निशाण सामाजिक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा:- महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील यांच्या विरोधात दिनांक 29 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निळे निशाण या सामाजिक संघटनेच्यावतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. व त्यानंतर नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर यांना निवेदन देण्यात आले.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी निळे निशाण संघटनेच्या महिला पदाधिकारी यांना शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले. त्या प्रकरणाच्या निषेधार्थ निळे निशाण या संघटनेने पोलीस निरीक्षक श्री के.के. पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलन करून व त्या आशयाचे लेखी निवेदन देवून केली. तसेच पुढील पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

महितिस्तव निवेदनाच्या प्रत जिल्हा पोलिस अधिक्षक, जळगाव व सर्व वरिष्ठ अधिकारी यांना पत्रव्यवहाराद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच कुठलीही कारवाई न झाल्यास याबाबत न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे सांगितले. निवेदन देते वेळी शहर पोलीस स्टेशनला पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावळे यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला व योग्य ती चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले. यामुळे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र येत्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी अशोक तायडे, दिवाणजी साळुंखे, अनिता बाविस्कर, बबिता बाविस्कर, गिता वाघ, पिंकी सुतार, इंदिरा कोळी, विद्या बाविस्कर, चारु सोनवणे, वैशाली हिरोळे, अशोक तायडे, विलास तायडे, चंद्रकांत सोनवणे, इकबाल तडवी, आबीद कुरेशी, प्रविण करनकाळ, उदय मोरे आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More