चोपडा तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व, शिंदे गटाला फटका..

चोपडा तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व, शिंदे गटाला फटका

मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी..


चोपडा
तालुक्यात 22 पैकी दोन ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि सदस्य बिनविरोध झालेले होते. मात्र वीस गावांमध्ये सरपंच पदासाठी आणि सदस्य पदांसाठी रविवारी मतदान झाले होते. मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजेपासून सुरू झाल्यानंतर संमिश्र निकाल येण्यास सुरुवात झाली. त्यात सरपंच पदासाठी थेट पक्षातर्फे उमेदवार रिंगणात नसले तरी पक्षाचे प्रमुख व्यक्तीचे नाव ठेवून उमेदवार हा रिंगणात उतरलेला असतो. म्हणून जवळपास वीस ग्रामपंचायत मधून निम्मेपेक्षा जास्त ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व ठाकरे गट असे महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत. तर निम्मेपेक्षा कमी ग्रामपंचायती चे सरपंच हे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठे असलेले अडावद या गावातही महाविकास आघाडीच्या सरपंच व लासुर या गावामध्येही शिंदे गटाच्या सरपंच पदाचा पराभव करून काँग्रेस चे सरपंच ठिकाणी विजयी झालेले आहेत. गाव निहाय सरपंच पदावर विजयी उमेदवाराचे नाव तर त्यांनी मिळवलेली कंसात मते –
कठोरा- एकनाथ दामू कोळी (589),
तावसे बुद्रुक – रेखा किशोर चौधरी (बिनविरोध),
आडगाव- भारतीबाई राजेंद्र भिल (402),
नरवाडे – मंगल रूपसिंग भील (329),
अंबाडे- शुभांगी सुनील भील (656),
वडगाव बुद्रुक- प्रतिभा गणेश पाटील (815),
सुटकार – रवींद्र भगवान ठाकरे (410),
अडावद – बबनखा लालखा तडवी (4010),
गणपुर भूषण मोतीलाल भील (1662),
धुपे बुद्रुक- सुक्राम भिवसन अहिरे (बिनविरोध),
लासुर – नर्मदाबाई भिवसन भील ,
मालखेडा – गणेश लोटन पाटील(322),
विचखेडा धूपे – रवींद्र बाळकृष्ण पाटील (512),
अनवर्दे खुर्द – सचिन प्रल्हाद शिरसाठ (700),
तावसे खुर्द – कल्पनाबाई शांताराम पाटील (373),
वाळकी – रूखमाबाई वसंत कोळी (518),
कठोरा – एकनाथ दामू कोळी (589),
वडती – देविदास हरिश्चंद्र धनगर (847),
वराड – अजय ईश्वर गवळी (508),
पारगाव – वंदनाबाई प्रकाश इंगळे (467),
लासुर – नर्मदाबाई भिवसन भील(2337),
विष्णापूर – जगदीश रामदास भील(392),
अंबाडे – शुभांगी सुनील भील (656),कोळंबा – वाल्मीक मधुकर बाविस्कर (963),
घुमावल येथे अनुसूचित जाती साठी सरपंच पद राखीव होते.मात्र सरपंच पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सरपंच पद रिक्त आहे.


मतमोजणी ची प्रक्रिया नो टेबलवर पार पडली असून त्यासाठी संपूर्णपणे विवरचना तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार सचिन बांबोडे केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी व्यवस्था ठेवली तर सरपंच पदाच्या उमेदवारांची मतमोजणी उशिरा आल्याने लोकांमध्ये अनेक वेळ संभ्रम निर्माण झालेला होता म्हणून मतमोजणी मध्ये सरपंच पदाचा निकाल सगळ्यात उशिरा जाहीर झाल्याने प्रचंड गदारोळ या उपस्थित ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला होता.


तालुक्यातील २२ गावांच्या निवडणुका असल्याने प्रत्येक गावांमधून निकाल ऐकण्यासाठी नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीला गर्दीचा वेढा होता. प्रचंड गर्दी यानिमित्त चोपडा शहरात आलेली होती. परंतु मतमोजणी वेळी कोणतीही दुर्घटना किंवा आपसात वाद झाले नाहीत. यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला तर त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे संतोष सोनवणे यांनीही चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

  • मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी-
    बावीस गावांसाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये चोपडा शहरासह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांची निवडणुकीसाठी मदत घेण्यात आली. मात्र गेल्या तीन ग्रामपंचायती निवडणुकांपासून या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ही या कर्मचाऱ्यांना एक रुपया कर्तव्याचे पैसे न दिल्याने या सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More