राज्य सरकारकडून विरोधकांवर खोट्या कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न ! चोपड्यातराष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

राज्य सरकारकडून विरोधकांवर खोट्या कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न ! चोपड्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

चोपडा ( प्रतिनिधी )—–
देशाचे नेते खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी व महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जामखेडचे आमदार रोहित पवार लढत आहे.

परंतु विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी राज्य सरकारने आमदार रोहित पवार यांचेवर ईडीची कारवाई करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
केंद्र व राज्य सरकार विरोधी पक्षाचे नेते आणि
आजी माजी आमदार व खासदार यांच्यावर खोट्या कारवाया करून नामोहरण करण्याचा
प्रयत्न करीत असून,सरकारने सुडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नायब तहसीलदार सचिन बांबळे,अव्वल कारकून आर.आर.महाजन यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,केळीउत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विमा नाकारून पीक विमा कंपन्यांनी अन्याय केला असून,सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामांवर गंभीर परिणाम झाला आहे त्यामुळे शेतीमालाच्या उत्पन्नात मोठी घट आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे .कापूस,ज्वारी, बाजरी,उडीद,मुग पिकांना त्वरीत पीकविमा देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देतांना चोसाकाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,संचालक शशिकांत देवरे,बाजार समितीचे व्हॉ.चेअरमन विनायक चव्हाण,सूतगिरणीचे व्हॉ.चेअरमन प्रल्हाद पाटील, संचालक अमृतराव वाघ,कैलास बाविस्कर,माजी संचालक तुकाराम पाटील,भालेराव पाटील, पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद जैन,पंचायत समितीचे माजी सभापती प्रा.भरत पाटील,माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,विधानसभाक्षेत्र प्रमुख अमोल राजपूत, युवकचे शहराध्यक्ष समाधान माळी, राष्ट्रवादीचे ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष किशोर दुसाने,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साळुंखे, जिल्हा सरचिटणीस दीपक वानखेडे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बाविस्कर, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पाटील,प्रफुल स्वामी,राकेश पाटील,रणजित देशमुख,सागर पाटील,जितेंद्र मराठे,छोटू विसावे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More