योगेश वाघ यांनी आई वडिलांचा स्मरणार्थ लासूर जी.प.शाळेला 79 हजार रुपयांचा भेट वस्तू दिले

योगेश वाघ यांनी आई वडिलांचा स्मरणार्थ लासूर जी.प.शाळेला 79 हजार रुपयांचा भेट वस्तू दिले

चोपडा (प्रतिनिधी) लासूर :- जग जरि २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण भागात चालीरीती यांना फार महत्त्व दिले जाते. परंतु या सर्व चालीरीतींना बाजूला सारून विनाकारण कारण नसतांना पैसा खर्च करून देखील समाजात कोणी त्यांचे नाव काढेलच असे नाही.


म्हणून तालुक्यातील लासूर येथील एक दानशूर व्यक्ती मत्व असलेल्या श्री नाटेश्वर पिकं संरक्षण सोसायटीचे संस्थापक चेअरमन तथा माजी ग्रा. पं. सदस्य स्वर्गीय नारायण दामोदर वाघ यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले.  वडील स्वर्गीय नारायण दामोदर वाघ, व स्वर्गीय आई  हेमलता नारायण वाघ यांचे स्मरणार्थ
त्यांचा मुलगा योगेश नारायण वाघ यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रिया च्या दिवशी अन्न दानावर वाजवी पेक्षा जास्त पैसा खर्च न करता गांवातील जिल्हा परिषद च्या शाळेत जे गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी ज्या काही अडचणी येतात. त्या येवू नये. म्हणून त्यांनी गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची / मुलींची शाळेत विद्युत पुरवठा गेल्यावर ज्या काही अडचणी निर्माण होतात. त्या दूर व्हाव्यात म्हणून  इनव्हिटर संच आणि मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी एलईडी टिव्ही संच उपलब्ध व्हावा. या शुध्द अंत करणातून त्यांनी चक्क आपल्या वडिलांच्या दशक्रिया च्या दिवशी जवळ जवळ ७९,००० रूपये किम्मतीचे भेट वस्तू म्हणून दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक, उप शिक्षक यांच्या कडे सुपुर्द केले. या त्यांच्या चांगल्या कामाविषयी समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


याप्रसंगी चोपडा सहकारी सुतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ, शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, प्रा. अशोक पवार अमळनेर, माजी उपसरपंच  अनिल पाटील, उपेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, मनिष पाटील, राकेश पाटील यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More