चोपड्यात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

चोपड्यात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा


चोपडा प्रतिनिधी


चोपडा येथील सोनार समाज संत नरहरी फाउंडेशन यांच्यावतीने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून पालखीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी शहरातून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. समाज बांधवांनी उत्साहात यात सहभाग घेतला.

याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात कु.आराध्या वानखेडे, कु.अंकिता सोनार, कु.मयुरी भामरे, चि.हर्षल सोनार, यश वाखारकर, प्रसन्न जडे, साहिल सोनार,कु.जानवी विसपुते,मनुष्री रनाळकर व निकिता सोनार यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील यशवंत व किर्तीवंत व्यक्तींचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला त्यात  संदीप सोनार,  प्रशांत सोनार सर, संजय बागुल सर, राकेश विसपुते सर, रत्नमाला दुसाने मॅडम व कार सेवक  अनिल भाऊ वानखेडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक श्री नितीन भाऊ अहिरराव यांच्या वतीने कै. आबासाहेब पंढरीनाथ कृष्णा अहिरराव यांच्या स्मरणार्थ समाज रत्न व समाजभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले यात श्रीमती सुशिलाबाई दत्तात्रय सोनार, प्रभाकर नाना शेठ सोनार व मुकुंदा भोजू शेठ दुसाने यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला व मानाचा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ विधीतज्ञ  ॲडव्होकेट अशोक भिकाजी जाधव यांना देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात सोनार समाज बंधू भगिनी उपस्थित होते.

तसेच प्राध्यापिका आशाताई पोतदार मॅडम यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष  विलास सोनार सर, उपाध्यक्ष  नितीन भाऊ अहिरराव, सचिव डॉक्टर विजय जाधव, खजिनदार  रविंद्र वानखेडे तसेच रवींद्र विसपुते भटू शेठ विसपुते श्री मुकुंदा शेठ दुसाने अनिल भाऊ वानखेडे, श्याम सोनार, श्रीराम शेठ सोनार, भूषण बागुल राकेश विसपुते रोहित सोनार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर विजय जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More