रोटरी क्लब चोपडा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर , सचिवपदी भालचंद्र पवार.-१८जुलै रोजी होणार पदग्रहण

रोटरी क्लब चोपडा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर , सचिवपदी भालचंद्र पवार.
-१८जुलै रोजी होणार पदग्रहण

चोपडा शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडा १ जुलै २०२४ ते ३० जुन २०२५ या वर्षासाठी नुतन अध्यक्ष म्हणून डॉ ईश्वर सौदांणकर , तर सचिवपदी भालचंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.


मावळत्या अध्यक्ष चेतन टाटीया तसेच मावळते सचिव अर्पित अग्रवाल यांच्याकडून पुढील महिन्यात 18 जुलै रोजी होणाऱ्या पदग्रहण समारंभात नूतन अध्यक्ष व सचिव पदभार स्वीकारतील. रोटरी क्लब चोपडा च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात नागरिकांच्या आरोग्यदायी सेवेसाठी ऑर्थोपेडिक लायब्ररी, डायालीसिस सेंटर, रोटरी उत्सव असे कायमस्वरूपी प्रकल्पांसह विविध आरोग्य, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

शिक्षण क्षेत्रात डॉ. ईश्वर सौदांणकर हे भगिनी मंडळ चोपडा संचलित ,समाजकार्य महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून तर , भालचंद्र पवार हे सतत्रासेन येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून शहरातील नागरिकांना परिचित आहेत. येत्या वर्षभरात आरोग्य, पर्यावरण, कृषी, महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More