चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली रुग्णवाहिकेला लागली आग रुग्णवाहिका जळून खाख # सुदैवाने जीवित हानी नाही ..

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली रुग्णवाहिकेला लागली आग रुग्णवाहिका जळून खाख # सुदैवाने जीवित हानी नाही ..

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला पहाठे सव्वा चार वाजता अचानक आग लागली आग लागल्याचे कमलेश साहेबराव धनगर सिटी स्केन टेक्निशियन हे पहाटे बाथरूम साठी उठले असता रुग्ण वाहिकेचा पुढील भागात आग लागल्याचे त्यांना दिसले त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला कळविले पाहिले ११२ वर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नसल्या मुळे हिम्मत धनगर व कमलेश धनगर यांनी मोटर सायकल वर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशमन दलाला सोबतच आणले.

आगीवर नियंत्रण मिळवणारी टीम

आग विजवण्या साठी घटनास्थळी कमलेश धनगर , सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर, 108 चे डॉक्टर नदीम शेख, 108 ड्रायव्हर हिम्मत धनगर,फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कोळी गणेश पाटील, राकेश सोनवणे वसंत सपकाळे,यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आगीवर नियंत्रण मिळवले तो पर्यंत रुग्णवाहिका जळून पूर्ण खाखं झाली होती.
रुग्ण वाहिकेत शॉर्ट सर्किटमुळे मुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने रुग्ण वाहिका उभी असल्यामुळे जीवित हानी झाली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More