पहलगाम येथील घटनेच्या चोपडा येथील मुस्लीम बांधवांकडून निषेध ..

पहलगाम येथील घटनेच्या चोपडा येथील मुस्लीम बांधवांकडून निषेध ..

दि.25 एप्रिल रोजी चोपडा शहरात  पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा  मुस्लिम समाजा कडून जाहीर निषेध व मृत पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रदांजली मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित व देशप्रेमी नगरीकांकडुन पाकीस्तान मुरदाबाद अश्या घोषणा देवुन चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांना निवेदन देण्यात आले .

दि २१ रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मोठ्या संख्येने पर्यटक गेलेले होते. सदर ठिकाणी काही अतिरेक्यांनी हिंदू धर्मीय पर्यटकांना तसेच एका स्थानिक मुस्लीम व्यक्तीला गोळ्या घालून जीवे ठार मारले व त्यात २९ बांधव मृत्युमुखी झाले. सदर भ्याड हल्ल्याचा आम्ही सकल मुस्लीम समाज, चोपडा तीव्र निषेध करीत असून सदर अतिरेक्यांचा शोध घेण्यात येवून त्यांना तसेच त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांना कठोर शिक्षा करण्यात यावे ह्या आशयाचे निवेदन चोपडा शहर पोलिसांना देण्यात आले ह्या वेळी माजी उपनगराथ्यक्ष हुसैनखां पठाण, मुक्तार सरदार,अरमान अली सैय्यद,नौमान काजी,साबीर सिद्दिक,एस.बी.नाना,मक्सुद पठाण,मोहसीन शेख,साबीर अरब,बिलाल शेख,नईम शेख,जाकीर शेख,जाकीर अहलेकार,मोहसीन हैदर,शहबाज शेख,उस्मान शेख,कालु मैकानीक,शकील शेख,आदी हजर होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More