चोपडा येथील मुख्तार सरदार यांना पोलिस अधीक्षकांचा हस्ते प्रशंसापत्र
चोपडा शहरातील लाकूड व्यावसायिक मुक्तार युसुफ सरदार यांना दि.१८ रोजी चोपडा शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवणे कामी तसेच समाजात एकता प्रस्थापित करणे साठी तात्काळ पोलीस प्रशासनाला मदत करणे तसेच सहकार्य करणे ह्या सुकार्यबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडून प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व समाज बांधव व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावित राहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल हीच अपेक्षा व्यक्त करत चोपड्यातील त्याचा चाहत्यांनी मुक्तार सरदार यांना शुभेच्छा दिल्या












