जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रुग्ण आढळले जळगाव@571

जळगाव जिल्ह्यात 233 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले

जळगाव, (जिमाका) दि. 28 – पाचोरा, रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 106 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. यापैकी 92 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोराचे तीन, निभोंरासीम येथील तीन, रावेर येथील एक, भोकर येथील तीन, भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील डहाके नगर, कोळीवाडा, पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक व्यक्तींचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 571 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 233 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर 68 रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More