चोपडा : वर्डी, ता.चोपडा येथे गुळी नदीच्या पाण्यात संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन युवक वाहून गेल्याची दुर्घटना घडली.

सेल्फी काढत असताना ही घटना झाली. सध्या गुळी नदीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान सोनू केशव ढिवरे(22 ) रा.वर्डी तर दुसरा सिद्धार्थ शिवाजी साळूंखे (वय21) रा.वर्डी हे युवक पाण्यात सेल्फी व फोटो काढण्यासाठी उतरले होते. नदीपात्रात दगडी बंधारा बांधला असून सेल्फी काढताना त्यावरून खाली वाहणाऱ्या पाण्यात ते पडले आणि वाहून बेपत्ता झाले. घटनास्थळी अडावद आणि चोपडा पोलीस दाखल झाले असून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. या घटनेतील एक युवक विनोद कांबळे हा मुलगा बचावला आहे. त्याने ही घटना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला रात्री साडे दहा वाजेपर्यंत कोणाचा ही पत्ता लागलेला नाही शोध कार्य सुरू असल्याची माहिती अडावद पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक भदाणे यांनी दिली













