चोपडा येथून एस टी (लाल परी)च्या माल वाहतुकीचा शुभारंभ

चोपडा ( प्रतिनिधी ) तीन महिन्यापासुन कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असून संपुर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यात वाहतुकीवर देखील बंदी घातली असल्याने शेतकरी सह व्यापारींचा माल पडुन राहत असल्याने माल खराब होवुन नुकसानाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व व्यापारींचे नुकसान होवु नये म्हणुन शासन व राज्य परिवहन महामंडळाने


एस टीची माल वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे . याच अनुषंगाने दि ५ जुन रोजी चोपडा आगारातील माल वाहतुकीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती नारायण पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते बाजार समितीत करण्यात आला. यावेळी चोपडा बाजार समितीतील अमृतलाल सोहनराज जैन यांच्या कडुन ८ टन भुसार ( धान्य ) माल न्यू प्रविण प्रोव्हीजन पंकजकुमारजी मुकुंदवाडी औरंगाबाद यांच्या कडे रवाना करण्यात आले.चोपडा यावेळी बाजार समिती संचालक कांतीलाल पाटील, भरत पाटील, मगन सर बाविस्कर, विठ्ठल पाटील, आगार प्रमुख संदेश क्षीरसागर, अनिल बाविस्कर, डि डि चावरे , ए टी पवार व्यापारी धिरज सुराणा,पवन अग्रवाल ,अजितकुमार सुराणा, राजुशेठ छाजेड, अजय अग्रवाल , पुरुषोत्तम अग्रवाल, बबलुभाई, गोटुभाई, जतनशेठ सुराणा बाजार समितीचे सचिव निळकंठ सोनवणे, जितेंद्र देशमुख , एस टी कर्मचारी अशोक बाविस्कर ए आर शिरसाठ, शाम धामोळे, भगवान नायदे सह व्यापारी, हमालमापाडी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More