जिल्ह्यात आज पुन्हा 63 कॉरोना बाधित आढळले जळगाव@1083,आज चोपडा येथे तीन कोरोना बाधित आढळले चोपडा@६९

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. रविवारी दुपारी 63 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 1083 रुग्णांची संख्या झाली आहे. यात जळगाव शहर 12, भुसावळ 10, अमळनेर 15, चोपडा 3, धरणगाव 2, यावल 8, एरंडोल 4, जामनेर 3, रावेर 4, चाळीसगाव 2, बोदवड 1 आणि अन्य जिल्ह्यातील 1 असे एकूण 63 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

आज चोपडा तालुक्यात तीन नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यात दोन हातेड येथील तर एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला चोपडा येथील पाटील दरवाजा भागातील रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली .चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांचि संख्या ६९वर पोहचली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More