हस्ती बँकेच्या चोपडा शाखेत दिनदर्शिका – 2026 चे प्रकाशन

हस्ती बँकेच्या चोपडा शाखेमध्ये नवीन वर्ष सन – 2026 च्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बँकेचे विद्यमान प्रेसिडेंट मा. कैलासभाऊ जैन, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष मदनभाऊ जैन, बँकेचे सीईओ सतिषजी जैन यांच्या मार्गदर्शनात हस्ती बँकेने सन 2026 ची दिनदर्शिका तयार केली आहे.

हस्ती बँकेची दिनदर्शिका ही दरवर्षी ग्राहकाभिमुख बदलांसह प्रसिद्ध होत असते. या वर्षीची दिनदर्शिका विशेष ठरण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहकांना थेट बँकेच्या वेबसाईटवरील आवश्यक माहिती सहज पाहता येणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यास चोपडा शाखा समिती चेअरमन कुशालजी जैन यांच्यासह समिती सदस्य प्रवीणजी अग्रवाल, शामजी लाड, शैलेशजी जैन उपस्थित होते. बँकेचे सभासद व ग्राहक संदीप जैन, प्रवीण जैन, विशाल लाड, सचिन जयस्वाल तसेच शाखा व्यवस्थापक प्रणव गुजराथी आणि कर्मचारी भूषण श्रावगी, सोपान महाजन, रक्षा तांबट, अमोल पाटील व पिग्मी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More