बदलापूर स्री बीज तस्करीचे चोपडा कनेक्शन? #स्त्री बीज तस्करी प्रकरणात चोपडा येथून आरोपीस अटक

चोपडा ( वार्ताहर ) – बदलापूर मुंबई येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे थेट धागेदोरे तालुक्यातील चहार्डी गावापर्यंत पोहचल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी सतीश दिलीप चौधरी (३५ ) याला दोन दिवसांपूर्वीच बदलापूर पोलिसांनी चहार्डी गावातून अटक करत तपास कामी मुंबई नेले आहे.

यातील संशयित आरोपी सतीश चौधरी हा मूळ चहार्डी ता.चोपडा येथील रहिवासी असला तरी तो गत सात ते आठ वर्षांपासून परिवारासह नाशिक येथे राहत होता.नाशिक येथील मालती हॉस्पिटल येथे त्याचे इलेक्ट्रिशनचे काम सुरू होते.इथेच त्याचे बनावट आधार कार्ड बनणाऱ्या टोळीशी संपर्क झाला.त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाचे बनावट आधार कार्ड बनवले.ज्या शेजारी माणसाचे आधार बनवले होते,तो इसम बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पकडला गेला.

आपण बनवून दिलेला बनावट आधार आणि माणूस मोठ्या प्रकरणात अडकला असल्याची भनक सतीश चौधरीला लागताच त्याने आपला गाशा गुंडाळत मूळ गाव चहार्डी गाठले.मात्र तपासाची चक्रे फिरत स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलिस उप निरीक्षक केशव हासगुळे आणि पथकाने चोपडा शहर पोलिस स्टेशन गाठत त्यांच्या मदतीने संशयित आरोपी सतीश चौधरी यास चहार्डी येथील राहत्या घरातून अटक करीत मुंबई तपासकामी घेऊन गेले आहेत.

या सर्व प्रकरणात बदलापूर पोलिस ठाणे गुरनं ६८ / २०२६ अन्वये विविध गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले असून गुन्हा दाखल आहे.

स्त्री बीज प्रकरणात चोपड्याच्या कोणत्या डॉ ने गर्भपात केले आहे का? ह्या विषयी चर्चा सुरू झाली आहे. खरच चोपड्याचे डॉ. ह्या प्रकरणात सामील आहे का ? हे तर चौकशी अंती समजेलच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More