विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी मिळणार पाठबळ: दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा आणि काईट स्टार्टअप फोरम जळगाव यांच्यात सामंजस्य करार

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा आणि काईट स्टार्टअप फोरम, जळगाव यांच्यात दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारा अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना नवीन उद्योग-व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत होईल. या सामंजस्य करारा अंतर्गत महाविद्यालयात अद्ययावत इनोवेशन-इनक्यूबेशन सेल स्थापन करण्यात येणार आहे. स्थानिक गरजा व समस्या ओळखून त्या अनुरूप उद्योग, व्यवसाय व संशोधनाला चालना मिळणार आहे. करारामुळे उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वोतपरी तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.

 

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे तसेच काईट स्टार्टअप फोरम चे चेअरमन प्रा. डॉ. शांताराम बडगुजर व संचालक श्री. सागर पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील तसेच सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले

याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ, रजिस्ट्रार  डी एम पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. पटले, इंग्रजी विभाप्रमुख डॉ. दीनानाथ पाटील, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत देवरे व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी डी कर्दपवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More