अंमळनेर व चोपडा तहसीलदारांसह 4 अधिकाऱ्यांना नोटिसा# सावखेड्यातील वाळूप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई # चौकशी अंती निलंबनाची शक्यता

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदार, सावखेडा व निमगव्हाण (चोपडा) येथील तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना नोटिसा बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीवरच्या वाळू घाटावर जप्त केलेल्या वाळूसाठ्यापोटी १२ लाख ७९ हजार ३४४ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर जप्त यंत्रणा सामुग्री पोटी १ कोटी ६१ लाख ७० हजारांना दंड ठोठावला आहे. एकीकडे दंडात्मक कारवाई होत असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार यंत्रणेला दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार दोषी ठरल्यास तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तर तहसीलदारांवर कारवाई निश्चित करून तसा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय महसुल विभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले. कारवाईच्या आहे. रडारवर आणले

त्यानुसार अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, चोपड्याचे भाऊसाहेब थोरात, सावखेड्याचे मंडळाधिकारी कल्याणी पाटील, तलाठी पवनकुमार शिंगारे, निमगव्हाणचे मंडळाधिकारी सुरेश पाटील व तलाठी तिलेश पवार यांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कारवाईचा निर्णय घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More