चोपड्यात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ५ जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

चोपड्यात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ५ जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

​चोपडा: शहरातील शेतपुरा भागात कत्तलीच्या उद्देशाने ५ जनावरे बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी १८:३० वाजेच्या सुमारास शेतपुरा भागातील उर्दू शाळेमागील परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी आहदअली मोहेबअली सय्यद (वय ५६, रा. शेतपुरा, चोपडा) याच्या मालकीच्या मोकळ्या जागेत ५ जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आढळून आले.

​या जनावरांची एकूण किंमत ३,००,००० रुपये असून, पोलीस प्रशासनाने ती जप्त केली आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (२०१५ पर्यंत सुधारणेसह) कलम ५(अ), ५(ब) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत धनगर करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More