आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल चोपडा तर्फे करोना योद्धा यांचा सन्मान

आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल चोपडा तर्फे करोना योद्धा यांचा सन्मान

चोपडा येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल मध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.पालकसभेस सरस्वती विद्यालय,मुंबई चे मुख्याध्यापक श्री.मुकुंद पाटील. श्री .व्हि.के.पाटील, नंदुरबार व संस्थेचे अध्यक्ष डाॕ.श्री राहुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर पालकसभेत करोना कालावधीत जे पालक डाॕक्टर्स, परिचारिका पॕथाॕलाॕजिस्ट,केमिस्ट अँड ड्रगीस्ट यांनी जनसामान्यांची सेवा केली अशा पालकांचा करोना योध्दा म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हातुन सत्कार करण्यात आला.

तसेच करोना लाॕकडाऊन कालावधीत ज्या पालकांनी धडपड करुन विद्यार्थ्यांना दिलेले गृहकार्य पुर्ण करून शाळेत येवून जमा केले अशा पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डाॕ. राहुल पाटील यांनी केला.शाळेतुन आॕनलाईन व आॕफलाईन पध्दतीने घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमांची माहिती व त्यांची क्षणचित्रे शाळेचे मुख्याध्यापक श्री.उमेश महाजन यांनी संगणकाच्या सहाय्याने प्रदर्शित केली.सभेस पालक(आई-वडिल ) मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षिय भाषणातुन पालकांना त्यांच्या सहकार्याबद्दल प्रोत्साहन पर शब्दांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितेश वाघ व दिपाली पाटिल यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More