घोडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ इंदुबाई शामलाल भिल्ल व उपसरपंचपदी जितेंद्र सुधाकर पाटील यांची बिनविरोध निवड
चोपडा प्रतिनिधी —
चोपडा तालुक्यातील घोडगाव ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली , इंदुबाई शामलाल भिल्ल यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी जितेंद्र सुधाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी पी साळुंखे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक सुनील सोनवणे , ग्रामपंचायत कर्मचारी नाना सुतार व दिनेश पाटील यांचे सहकार्य लाभले .

याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी ,सुनील कोळी , मिनाज मन्यार ,विजया पाटील , मोनाली मोरे ,सुजाता पाटील , किशोर दुसाने आदी उपस्थित होते .
प्रा प्रदीप लिंबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर किशोर दुसाने यांनी आभार मानले .सदर निवडणूक प्रसंगी दिलीप कोळी , महेश पाटील , सुनील पाटील, प्रकाश पाटील , जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ..












