शहर पोलीस स्टेशनकडून कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी २५००० रुपयांची मदत
चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुका कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात हॉटस्पॉट झालेल्या आहे २०० खाटाचे नवीन प्रशासकीय इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे तिथे ऑक्सिजनची व्यवस्था लोकवर्गणीतून गेला जात आहे .

यात अनेकांनी देणगी दिली आहे. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देखील देणगी देण्याची भावना झाल्याने आज दि.२९ रोजी चोपडा शहर पो स्टे कडून सामाजिक बांधिलकी म्हणून स्वेच्छेने पो स्टे अधिकारी व अंमलदार यांच्या वर्गणीतून चोपडा तालुक्यात कोरोना आपत्ती शी लढण्यासाठी मदत म्हणून रोख 25000 रु मा तहसीलदार श्री अनिल गावित यांना सुपूर्द करण्यात आले चोपडा शहर पो स्टे कोरोना लढ्यात नेहमी आघाडी वर राहील व आपल्या पूर्ण क्षमतेने कर्तव्य पार पाडले तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून आवश्यक ती सर्व मदत चोपडा तालुका वासीयांना करेल असे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी बोलताना सांगितले. पोलीस कर्मचारी दिवसभर आपली नोकरी च्या ठिकाणी कर्तव्यदक्ष राहून देखील कोरोना लढ्यात आपला देखील हातभार लागावा या हेतूने त्यांनी ही मदत केली म्हणून शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.












