चोपडा येथील आढावा बठकीत महात्मा फुले योजनेचा लाभ न देणाऱ्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करा खा रक्षा खडसेंचे जिल्हाधिकारी यांना सूचना
चोपडा येथील बैठक विविध विषयांनी गाजली
बैठकीत शिवसेना – भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर आक्रमक
चोपडा प्रतिनिधी :—-सचिन जैस्वाल
येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तालुक्यातील कोविड संदर्भात विविध विषयांवर बैठक संपन्न झाली .
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा पाहावयास मिळाली त्यात सिटीस्कॅन संधर्भात रुणांची गैरसोय ,अवाजवी किंमत घेणे ,बिल न देणे ,रुग्णांना तात्काळत ठेवणे तसेच रेमडीसीवर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे , खाजगी हॉस्पिटलच्या बाहेर दर्शनी भागात शासकीय दरपत्रक लावणे तसेच खाजगी कोविड सेंटरला महात्मा फुले हमी योजनेचा लाभ मिळणे अशा विविध विषयांवर चर्चेसह भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली.

सदर बैठकीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण , प्रांताधिकारी सीमा अहिरे ,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते .
सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लातूरकर यांनी शहरी व ग्रामीण भागाची कोविडची सध्याची परिस्थिती विशद केली , त्यात चोपडा शहरात एकूण सहा खाजगी हॉस्पिटलमध्ये 446 रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले ,ग्रामीण भागात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून 38 उपकेंद्र असल्याचे सांगून गाव पातळीवर जास्तीत जास्त टेस्टिंग केल्या जात असून दररोज सुमारे तीनशे टेस्टिंग करत असल्याचे सांगितले .आतापर्यंत ग्रामीण भागात 19044 व शहरी भागात 10616 टेस्टिंग झाल्याचे स्पष्ट केले .
खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थितांच्या विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ,भारतीय जनता पार्टी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये काही विषयांवर जोरदार आक्रमकता व राडा दिसून आला .भारतीय जनता पार्टीने प्रशासनाचे विविध विषय चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला व शिवसेना कार्यकर्त्यांनी व भाजपचे माजी प स सभापती आत्माराम म्हाळके प्रशासनाची बाजू सावरण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून आले .
खासदार रक्षा खडसे यांनी त्यांच्या प्रयत्नातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात 15 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते सदर व्हेंटिलेटर ची विल्हेवाट मधल्या काळात दुसरीकडेच करण्यात आली होती तरी सदर व्हेंटिलेटर येत्या दोन दिवसात जसेच्या तसे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत .
उपस्थितामधून अनेकांनी प्रश्नांचा व समस्यांच्या भडिमार केला त्यात वेले येथील सरपंच दीपक पाटील यांनी आक्रमकता दाखवत गाव पातळीवर कोरोनाचा रुग्णांना मदत करणारे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे कोरोना योद्धा आहेत व त्यांना कोरोनाची लस मिळावी असे आग्रही मागणी केली तर rt-pcr रिपोर्ट दहा ते बारा दिवस पर्यंत येत नाहीत तोपर्यंत सदर रुग्णा मार्फत कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला असतो तर आर्टिपीसीआर रिपोर्टच्या अहवाल तात्काळ मिळावा अशी मागणी पंचायत समिती उपसभापती एम पाटील यांनी केली .
भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविंड चाचणीच्या ठिकाणी नियोजन शून्य काम असल्याचे सांगत, निगेटिव्ह व पॉझिटिव्ह रुग्ण एकत्र वावरतात त्यामुळेच कोरोनाचा प्रसार व फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगत रेमडीसीवरचा चोपडा शहरात काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे तसेच महेंद्रधनगर यांनी रेमडीसीवर इंजेक्शनचे चोपडा शहरात वेगवेगळे रेट का ? व इतर तालुक्यात कोरोनाचा प्रसार नाही मग चोपडा तालुक्यातच का ? यावर आत्मपरीक्षणाचा सल्ला देखील दिला .

************************************
खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले त्यात प्रशासन व गाव पदाधिकारी यात एकवाक्यता दिसून येत नाही तसेच गावपातळीवरच्या नेमलेल्या समितीच्या कुचकामी ठरत असून त्या पुन्हा सक्रिय कराव्यात अशा प्रकारच्या सूचना गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या तसेच चोपडा शहरात फक्त तीनच सिटी स्कॅन सेंटर असून रुग्णांना ताटकळत ठेवत असल्याचे अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहेत तरी सिटीस्कॅन चालकांनी दर्शनी भागावर रेट बोर्ड लावणे व बिल देणे बंधनकारक असल्याचे सांगितले .रेमडीसीवर इंजेक्शन रुपये बाराशेच्यावर विकणे चुकीचे असून त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असावे ,दैनंदिन मेडिसिन आढावा व अपडेट घ्यावा ,काळा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर वचक ठेवावा तसेच खाजगी कोविड हॉस्पिटलला महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अन्यथा सदर हॉस्पिटल वर कारवाईचे संकेत दिले ,मेडिसिन घेण्याची सक्ती करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल वर कारवाईचे संकेत दिले तसेच खाजगी कोविड हॉस्पिटलने दर्शनी भागात दरपत्रक लावणे व बिल देणे बंधनकारक असल्याचे सांगितले ,लसीकरणाची गती वाढवावी व गाव पातळीवरील समिती सक्रिय करावी अशा विविध सूचनांसह अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली .
सदर बैठकीत भारतीय जनता पार्टीचे पंकज पाटील , गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील ,प्रकाश पाटील ,दीपक पाटील, आत्माराम म्हाळके तर शिवसेना गटातून पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील , नरेश महाजन , राजेंद्र पाटील (बिटवा ) , विकास देशमुख , राजाराम पाटील ,महेंद्र धनगर यासह अनेकांनी बैठकीत व चर्चेत सहभाग नोंदवत प्रशासनाला धारेवर धरले .
सदर बैठकीस तहसीलदार अनिल गावित , मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , नायब तहसीलदार राजेश पऊळ ,उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील, डॉ गुरुप्रसाद वाघ ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर ,नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला , गट विकास अधिकारी बी एस कोसोदे यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ….












