चोपडा तालुक्यात मयत शिक्षक परिवाराचा शिक्षक समाजच बनला आधारवड मयत शिक्षक परिवारास प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत…

चोपडा तालुक्यात मयत शिक्षक परिवाराचा शिक्षक समाजच बनला आधारवड
मयत शिक्षक परिवारास प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत…
चोपडा प्रतिनिधी —


चोपडा तालुक्यात कार्यरत शिक्षक मयत झाल्यास गेल्या दोन वर्षापासून या परिवाराचा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षक बंधू – भगीनी आधारवड बनलेल्या असून मयत शिक्षक परिवारास आर्थिक मदतीची परंपरा अखंडपणे सुरु आहे.
कोरोनाने चोपडा तालुक्यात पंधरा पेक्षा जास्त शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून , जिल्हा परिषदेतील पाच शिक्षक परिवार देखील या दुर्दैवी प्रसंगातून गेलेले आहेत त्यात जिल्हा परिषद चुंचाळे शाळेवर कार्यरत असलेले त्रिशुल सदाशीव पाटील व सुटकार शाळेवर कार्यरत असलेले डिगंबर मंगा बाविस्कर यांचा देखील कोरोना महामारीत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे .


सदर घटना घडताच चोपडा तालुक्यातील सर्व संघटनेच्या माध्यमातून दोन्ही शिक्षकांना मयत निधी देण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी २५० पेक्षा जास्त शिक्षक व परिवारातील सदस्य कोरोना पाँझीटीव्ह होते अशावेळी देखील कोणतेही कारण न सांगता आँनलाईन मदत करून जिल्हा परिषद उर्दु व मराठी शिक्षकांची चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर एकी दिसून आली.व तालुक्यातील शिक्षकांनी संघटनेच्या आवाहनास साथ दिली त्यामुळे त्रिशुल सदाशीव पाटील यांची वारस व पत्नी पूनम त्रिशुल पाटील यांना महीला शिक्षक प्रतिनिधी सोनाली मधुकर साळूंखे,.दिप्ती योगेश सनेर,रुपाली चावदस सोनवणे सरला काळू बच्छाव ,कल्पना संभाजीराव पाटील ,मिनल पंढरीनाथ पाटील यांचे हस्ते चोपडा तालुका शिक्षक समाजाकडून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर दुसरीकडे सुटकार शाळेवर कार्यरत असलेले कै.डिगंबर मंगा बाविस्कर यांची वारस पत्नी श्रीमती चंद्रकला डिगंबर बाविस्कर यांना डिसीपीएस संघटनेचे जिल्हा पदाधीकारी विवेक पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतिष बोरसे, पारोळा पतसंस्थेचे माजी संचालक हरी नामदेव बाविस्कर ,राष्ट्रवादी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रदिप बोरसे व शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री योगेश सनेर यांचे उपस्थीतीत एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.


संकट हे कधीच कुणाला सांगून येत नसते म्हणुन संकटसमयी चोपडा तालुक्यातील शिक्षकांची एकमेकांसाठी धावून येण्याची प्रवृत्ती ही वाखाणण्याजोगी असून आदर्श परंपरेचे गटशिक्षणाधिकारी डाँ.भावना भोसले यांनी स्वागत केलेले असून या आदर्श परंपरेस त्यांची नेहमी तन मन धनाने साथ असते. नुकतेच तालुक्यात कार्यरत असलेल्या व मयत झालेल्या पाच शिक्षकांपैकी दोन परिवारास मदत देण्यात आलेली असून इतर तीन परिवारास देखील लवकरच न्याय देण्यात येणार आहे.
मयत निधी संकलनाचे काम विवेक पाटील ,परिक्षित चव्हाण ,राकेश पाटील मुश्ताक सर (उर्दु माध्यम) यांनी केले . आजपर्यंत तालुक्यातील शिक्षक बंधू भगीनींमुळे चोपडा तालुक्यात कै,ईश्वर सपकाळे,कै.नंदीनी पवार,कै सुरज शिंदे,कै.संजय देशमुख व आता कै.त्रिशुल पाटील तसेच कै डिगंबर बाविस्कर यांचे परिवारास एकुण पाच लाख बावण्ण हजार रुपये शिक्षक बंधू भगीनींमुळे संबधीतांच्या परिवारास देता आले आहेत.


तसेच सर्व संघटनेच्या मित्र परिवारातील दातृत्वामुळे तालुक्याला कोवीड 19 आँक्सीजन साठी देखील शिक्षक मित्रपरिवाराने वैयक्तिक एकवीस हजार रुपयांची मदत दिलेली आहे , म्हणुन अशा दातृत्ववान शिक्षक बंधू – भगीनींचे साऱ्या संघटना सदैव ऋणात राहतील तसेच चोपडा तालुक्यात कार्यरत नसतांना देखील आम्हांला आपले कुटूंब समजून मदत करणारे टिकाराम पाटील भडगाव,विपीन वसंतराव पाटील भडगाव रावसाहेब मांगो पाटील अमळनेर,सुनील कोंघे ग्रे मु खादगाव जामनेर, राकेश त्र्यंबक मोरे रावेर, इरफान तडवी जामनेर ,रफी खान जामनेर यांचेदेखील नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य असते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More