भारतीय जनता पार्टी व
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

भारतीय जनता पार्टी व
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी :——
कोविड १९ महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे त्या पार्श्वभूमीवर चोपडा भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ३० एप्रिल रोजी आसकरण ताराचंद जैन ब्लड बँकेत करण्यात आले .


गिरीषभाऊ महाजन, खा.श्रीमती.रक्षाताई खडसे,जिल्हाध्यक्ष.आ.राजुमामा भोळे,अनिकेत विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने चोपडा शहरातील आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात रक्ताचा प्रचंड भिषण तुटवडा निर्माण झालेला असताना गरजवंताना वेळेवर रक्ताचा पुरवठा उपलब्ध होत नाही आहे. त्या अनुषंगाने भाजप व युवा मोर्चा यांच्या वतीने कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते.त्यांचा आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी व जनतेने शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले.


शिबीरात एकुण १०५ रक्ताचा बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष पंकज पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, माजी सभापती आत्माराम माळके, जेष्ठ नेते प्रदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, राजु शर्मा, डॉ. नरेंद्र अग्रवाल, पाटील,रंजनाताई नेवे, हिम्मतराव पाटील, चंद्रकांत धनगर, पिंटु पावरा, विजय बाविस्कर, शुभम चौधरी, कार्यालयमंत्री मोहित भावे, लक्ष्मण पाटील, दीपक पाटील, भरत पाटील, रंजीत पाटील, विवेक गुजर युवा मोर्चा सरचीटणीस अमित तडवी, कृष्णा बाविस्कर, बापूराव पाटील, चेतन सावकारे, किशोर पाटील. व आदी कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More