अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दुर्गेश जैस्वाल यांची संचेती इन्स्टिट्यूटच्या पॅनलवर नियुक्ती

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दुर्गेश जैस्वाल यांची संचेती इन्स्टिट्यूटच्या पॅनलवर नियुक्ती

शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तथा जैस्वाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. दुर्गेश जैस्वाल यांची पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटल संचलित संचेती इन्स्टिट्यूट फॉर अर्थोपेडीक्स अँड रिहॅबिलेशन संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलवर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. दुर्गेश जैस्वाल यांनी यापूर्वी मुंबईतील नामांकित असलेले कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल व राजावाडी हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून काम केलेले आहे. रुग्ण सेवेचा दीर्घ अनुभव व अस्थिरोगातील नैपुण्य याच्या जोरावर डॉ. जैस्वाल यांची पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटल संचलित संचेती इन्स्टिट्यूट फॉर अर्थोपेडीक्स अँड रिहॅबिलेशन संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलवर नुकतीच नियुक्ती झाली आहे गेल्या दहा वर्षा पासून चोपडा शहरात जैस्वाल हॉस्पिटलच्या माध्यमातून ते रुग्णसेवा करीत आहेत.

विशेष म्हणजे खान्देशातून एकमेव अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉ. दुर्गेश जैस्वाल यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. ते भाजपाचे चोपडा शहराध्यक्ष व नगरसेवक गजेंद्र जैस्वाल यांचे भाऊ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More