मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत भाग्योदय दिनदर्शिकेचा निषेध.

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत भाग्योदय दिनदर्शिकेचा निषेध.

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीची नोंद भाग्योदय दिनदर्शीका मधे पहिल्या पानावर न करता मागच्या पानावर केलेली आहे. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी सदरील चुक प्रकाशक यांच्या लक्षात देऊन देखील त्यांच्या मार्फत उडवा उडवीचे उत्तर दिली जात असल्याचे शिवमुद्रा कडून सांगण्यात आले. हा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान असून, तो मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण कदापि खपवून घेतला जाणार नाही, असे वक्तव्य प्रतिष्टान कडून देण्यात आले आहे. सदरील चुकिची माफी जर प्रकाशक यांनी मागितली नाही तर पुढच्या वर्षी महाराष्ट्रात भाग्योदय दिनदर्शिकेचे प्रती विक्री होऊ देणार नाहीत. तसेच लवकरात लवकर प्रकाशक यांनी आपला माफिनामा सादर केला नाही तर मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे मावळे पुर्ण महाराष्ट्रात भाग्योदय दिनदर्शिकेची विक्री होऊ देणार नाही, असा इशारा मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित दादा चव्हाण व प्रदेशाध्यक्ष विकास ईश्वर निकम यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More