गोरगावले खुर्द येथे खा.रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमीत्त विकास कामांना सुरुवात..

गोरगावले खुर्द येथे खा.रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमीत्त विकास कामांना सुरुवात..


चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आली.सदरचे काम रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई निखिल खडसे यांच्या शिफारशीनुसार मंजूर झालेले असून गोरगावले खुर्द प्लॉट एरिया मधील मंगरूळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर हे काम करण्यात येत आहे.यासाठी हातेड बुद्रुक चे माजी सरपंच मनोज सनेर उर्फ विक्की डॉक्टर, गोरगावले बुद्रुक चे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर,चोसाका. संचालक अनिल रा.पाटील यांनीही विशेष प्रयत्न केलेले आहेत.


खा.रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन येथील सरपंच सौ.छायाबाई सुनील बागुले यांच्या शुभहस्ते ह्या विकासकामाचे नारळ वाढवुन,पूजन करण्यात आले.याप्रसंगी गोरगावले बुद्रुक चे माजी उपसरपंच अनिल पाटील, गोरगावले खुर्द चे माजी सरपंच सुनील बागुले, सामा. कार्यकर्ते दिनकरराव सपकाळे,किशोर पाटिल,वैभवराज बाविस्कर,न्यानेश्वर पाटिल,आबा ठाकरे,योगेश पाटील,झगूबाई ठाकरे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More