पार्टिशन न केलेल्या वाहनांवर चोपड्यात दंडात्मक कारवाई

पार्टिशन न केलेल्या वाहनांवर चोपड्यात दंडात्मक कारवाई
चोपडा प्रतिनिधी :—-


चोपडा शहरातील तीन चाकी रिक्षा व कालीपिली व्हॅन इत्यादी वाहनांची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये चालक व पॅसेंजर यांच्यामध्ये पार्टिशन न आढळून आल्याने शहर पोलिसांनी कारवाईसाठी सदर वाहने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरील मैदानावर जमा केली होती .सदर जमा केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याचे सुचित करण्यात आले आहे .


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ३१ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच जळगाव जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्याही माध्यमातून परराज्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांना महाराष्ट्रात दाखल होण्याच्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तासापूर्वीच्या आरटीपीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला आहे .कॉर्गो वाहतुकीच्या संदर्भात संबंधित वाहनांमधून केवळ दोन व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे त्यात चालक व मदतनीस यांचा समावेश आहे .तीन चाकी रिक्षा , कालीपिली व्हॅन दोन प्रवाशांची ने – आण करत असताना प्रवासी व चालक यांच्यात पार्टिशन असणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे न आढळल्यास सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे .चोपडा शहरातील तीन चाकी रिक्षा व कालीपिली अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे .त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


सदर कारवाई प्रसंगी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी आय अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील ( पोलीस उपनिरीक्षक) , सुमेर वाघेर ( शहर वाहतूक पोलिस ) , अंबादास मोरे , विकास पाटील ,अंबादास सैंदाणे इत्यादींनी कारवाई केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More