चोपडा नगर परिषदेच्‍या विविध प्रभागातील नवीन रस्‍त्‍यांच्‍या १४ कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्‍न

चोपडा नगर परिषदेच्‍या विविध प्रभागातील नवीन रस्‍त्‍यांच्‍या १४ कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्‍न

चोपडा प्रतिनिधी :—-


चोपडा शहराच्‍या सर्वांगिण वि‍कासाठी चोपडा शहर विकास मंचाच्‍या अथक प्रयत्‍नाने नगरपरिषदेसाठी विविध नागरी दलित वस्‍ती, महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नगरोत्‍थान महाअभियान (जिल्‍हास्‍तर), नागरी दलितेतर वस्‍ती सुधार योजना अंतर्गत इ. विविध योजनांतर्गत २३ कोटींची कामांस सुरवात झाली आहे. त्‍यापैकी आज दि. ११ जून वार शुक्रवार रोजी विठ्ठलकाका गुजराथी व मा. ना. अरुणभाई गुजराथी, माजी विधान सभा अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त चोपडा नगरपरिषद हद्दीतील रु. ५.८६ कोटी चे विविध १४ विकास कामांचे भूमीपूजन समारंभ आयोजित करणेत आला होता.

सदर विकासकामांचे भूमीपूजन कार्यक्रम मा. ना. अरुणभाई गुजराथी शुभहस्‍ते पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी घन:श्यामभाई अग्रवाल, (जेष्ठ नेते,भाजपा) व संदीपभैय्या पाटील, (अध्यक्ष,जळगांव जिल्हा काँ.आय.) होते.


सदर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा सौ.मनिषाताई चौधरी लोकनियुक्‍त नगराध्यक्षा, चोपडा नगरपरिषद होत्‍या. कार्यक्रमाचे वेळी चोपडा विकास मंचाचे गटनेते जीवनभाऊ चौधरी , बांधकाम समिती सभापती रमेशभाऊ शिंदे, उपनगराध्‍यक्ष भुपेंद्रभाई गुजराथी, मुख्‍याधिकारी अविनाश गांगोडे, नगरसेवक हितेंद्र देशमुख (राजूभाऊ), अशोक बाविस्‍कर, नारायण बोरोले, हुसेनखां पठाण तसेच सौ. सुप्रिया सनेर, सौ. कृष्‍णा पवार, सौ. दिपाली चौधरी, सौ. विमलबाई साळुंखे, सौ. सुरेखा माळी, सौ. लताबाई पाटील, सौ. अश्विनीताई गुजराथी आदी नगरसेवक तसेच प्रांतअधिकारी सुमित शिंदे , तहसिलदार अनिल गावित, चेअरमन चोपडा पिपल्‍स बॅंक चंद्रहासभाई गुजराथी, माजी नगराध्‍यक्ष रमणलाल गुजराथी, आशिषकुमार गुजराथी, माजी नगरसेवक संजयभाऊ कानडे, उद्योजक सुनिलभाई जैन, ईश्‍वर चौधरी, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मान्‍यवर कार्यकर्ते आदी मान्‍यवर तसेच नगर अभियंता सचिन गवांदे, बांधकाम विभाग लिपीक मनोहर बाविस्‍कर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग क्र. ७ गुजराथी गल्‍लीतील रस्‍त्‍यांच्‍या २ कामांच्‍या भूमीपूजनापासुन झाली. प्रभाग क्र.४ शेखपुरा मधील रस्‍ते व गटारीची २ कामे, प्रभाग क्र. ५ मधील यावल रोड व साने गुरुजी वसाहत तसेच महावीर नगर येथील रस्‍ता व गटारींची ३ कामे, प्रभाग क्र. १४ मधील बोरोले नगर येथील रस्‍त्‍यांची ४ कामे, प्रभाग क्र. ९ मधील रस्‍त्‍यांची ३ कामे असे एकूण १४ नवीन रस्‍त्‍यांच्‍या कामांचे भूमीपूजन सोहळा पार पडला.


प्रभाग क्र. ९ हरेश्‍वर कॉलनी मधील रस्‍त्‍यांचे कामाचे भूमीपूजन पार पडल्‍यानंतर माजी नगरसेवक श्री. एम. डब्‍ल्‍यु पाटील सर यांनी मा. ना. अरुणभाई व नगराध्‍यक्षा सौ. मनिषाताई चौधरी व गटनेते जीवनभाऊ चौधरी यांचे समस्‍त हरेश्‍वर कॉलनीती रहिवाश्‍यांच्‍या वतीने आभार व्‍यक्‍त केले. तसेच मा.ना. श्री. अरुणभाई यांनी देखिल नगरपरिषदेने विकास कामांची घौडदौड अशीच निरंतर सुर ठेवावी अशा शुभेच्‍छा मा. नगराध्यक्षा व चोपडा शहर विकास मंचास दिल्‍या. कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर सदर कार्यक्रम मार्यादित मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत साध्‍या पध्‍दतीने पार पाडण्‍यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More