चोपडा तालुक्यातील गरताड ला वीज पडून दोन बैल ठार #मेग गर्जने सह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

चोपडा तालुक्यातील गरताड ला वीज पडून दोन बैल ठार #मेग गर्जने सह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

चोपडा दि. 27 (प्रतिनिधी) आज मेग गर्जने सह झालेल्या पावसात  तालुक्यातील गरताड चोपडा रोड लगत भवानी मंदिर समोर दारासिंग दलसिंग बामणीया, हया आदिवासी पावरा व्यक्तीची बैल जोडी विज पडून मृत्यू झाला आहे . 7 जून उलटूनही चोपडा शहरात पावसाने दडी मारली होती. मात्र आज तिसऱ्या प्रहरी जवळपास 4:30 वाजता पावसाने विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावल्याने चोपडेकरांना अनेक दिवसांपासून सतावत असलेल्या प्रचंड उकाडय़ापासून गारवा मिळाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे हातगाडी वाल्यांची तारांबळ उडाली आहे

विजांचा प्रचंड कडकडाट व ढगांचा गडगडाट होत  पावसाने आगमन करत सर्वत्र पाणी च पाणी करून सोडले आहे. अर्धा तास चाललेल्या वरुण राजाच्या सरींनी गटारी भरून वाहू लागल्या आहेत तर बऱ्याच दिवसांपासून आंघोळ न करणाऱ्या रस्त्ये अक्षरशः चकाचक झाले आहेत तालुक्यातही बर्‍याच भागात पाऊल पडल्याचे चित्र होते. पेरणी योग्य पाऊस नसल्याचे बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More