चोपड्याच्या अश्विनी गुजराथी इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरमनपदी; चोपड्याला प्रथमच मान; चोपडा येथे शानदार समारंभात पदग्रहण

चोपड्याच्या अश्विनी गुजराथी इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरमनपदी; चोपड्याला प्रथमच मान; चोपडा येथे शानदार समारंभात पदग्रहण


चोपडा – महाराष्ट्रातील चंद्रपूरपासून ते इगतपुरीपर्यंत व्याप्ती असलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी चोपडा येथील भगिनी मंडळ संस्थेच्या सहसचिव तथा चोपडा नगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी गुजराथी यांची निवड झाली असून नुकताच चोपडा येथे झालेल्या पदग्रहण समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला. चोपड्याच्या इतिहासात एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी संधी मिळालेल्या त्या प्रथमच महिला आहेत.


चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या शानदार पदग्रहण समारंभात अश्विनी गुजराथी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मावळत्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, इनरव्हीलच्या प्रमुख पदाधिकारी डॉ. रश्मी शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मंचावर इनरव्हीलच्या पदाधिकारी मीनल लाठी, गिरीशा ठाकरे, शीला देशमुख, गौरी धोंड, रमा गर्ग व रोट्रॅक्टचे लोकेश बंसल हे उपस्थित होते. या समारंभास प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनीही ऑनलाईन उपस्थिती देत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


@हृदयातील हिरव्या झाडाला मानवतेचे पान येऊ द्या – अरुणभाई गुजराथी@
रोटरी, इनरव्हिल या संस्था जगभरात मैत्री, सेवा, प्रेमाचा संदेश पसरवत आहेत. ही एक मानवतेची चळवळ आहे. अंगावरील अलंकारापेक्षा मनुष्याच्या अंगी असलेला मानवतेचा अलंकार सर्वात महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयात एक हिरवं झाड लावा त्या झाडाला खतपाणी घालत प्रेम, सेवा, मैत्री, कारुण्य, दया आणि मानवतेचं एकेक पान येऊ द्या. आपल्या क्षमतांचा उपयोग परिवार, समाज आणि राष्ट्रासाठी व्हावा असे सांगत प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांनी गरजांवर आधारित कार्यक्रम घ्यावे, स्वयंसहायता बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन द्यावे असे सुचवत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


         पदग्रहण समारंभाच्या प्रमुख अतिथी डॉ. रश्मी शर्मा यांनी नवीन वर्षात इनरव्हीलचे नवीन पैलू समाजाला अनुभवता येतील असा विश्वास व्यक्त करत मागील वर्षात डिस्ट्रिक्ट ३०३ मध्ये झालेल्या कामांचे कौतुक केले व नव्या पदाधिकाऱ्यांकडून अधिक कामांच्या अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. रोटरीचे गव्हर्नर रमेश मेहेर यांनी तसेच एम. डब्ल्यू. पाटील यांनीदेखील आपल्या संदेशातून  इनरव्हीलच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


       नुतन डिस्ट्रिक चेअरमन अश्विनी गुजराथी यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील कामांची घोषणा करत अधिक जोमाने समाजाभिमुख काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रामुख्याने महिला सबलीकरण व जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या कामांवर आपला विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आपल्या डिस्ट्रिक्ट टीमची यावेळी घोषणा केली.
        तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उल्लेखनीय उपक्रमांसाठी विविध क्लब व इनरव्हील सदस्यांना पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच भगिनी मंडळाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचा परिसर रंगबिरंगी फुलांनी व आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता.


       पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन शुभ्रा व्यास व प्रीती दोषी यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकिता जैन यांनी केले. प्रारंभी महिला मंडळ शाळेच्या शिक्षिकांनी स्वागत गीत सादर केले तर अवनी गुजराथी यांनी उपस्थितांसमोर गणेश वंदना प्रस्तुत केली. या सोहळ्यास इनरव्हील डिस्ट्रिक ३०३ मधील सुमारे ६० महिला प्रतिनिधी प्रत्यक्ष तर सुमारे २०० प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More