सनपुले येथे कोव्हिडं19 लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

सनपुले येथे कोव्हिडं19 लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील सनपुले येथे 18 वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस साठीचे दिनांक-3 जुलै शनिवार रोजी लसीकरण आयोजित करण्यात आले होते.
लसीकरण केंद्रात कोव्हीशिल्ड या लसीचे 114 लोकांना लसीकरण करण्यात आले.

चाहार्डी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत जाधव आणि डॉ.महेंद्र पाटिल यांचे विशेष सहकार्यामुळे सनपुले गावात लसीकरण पार पाडल्या बद्दल गावातील लोकांनी चाहार्डी आरोग्य केंद्राचे विशेष आभार मानले.

प्रसंगी.. आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक रघुनाथ पाटील, आरोग्य सेवक-सुनील महाजन,आरोग्य सेविका-श्रीमती छाया नवल धनगर,
आशा सेविका-सरला उत्तम कोळी,रत्नज्योत गोविंदा बाविस्कर,छाया बळीराम पाटील,जयश्री रवींद्र मोरे,आदींनी लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे-
सनपुले येथील सरपंच-सुनंदाबाई हिरामण पाटील,
शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष-किरण एम गुर्जर,
हिरामण काशिराम पाटील
ग्रामविकास अधिकारी-संदीप पाटील
ग्रा.प.शिपाई-काशिनाथ पवार,
डाटा ऑपरेटर-नंदकिशोर पाटील,
आदी ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More