चोपड्यातील अमर संस्थेच्या विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

चोपडा ( प्रतिनिधी )—–
येथील अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय,लिटल हार्ट इंग्लिश मेडियम स्कुल चोपडा व संत गजानन महाराज विद्यालय वेले या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर धडक देऊन स्पर्धेसाठी चोपड्याचे नाव राज्यपातळीवर पोहचले आहे.
फिल्ड आर्चरी प्रकारच्या विभागीय क्रिडा स्पर्धा
नाशिक येथे के.टी.एच.एम.कॉलेज मध्ये आज दि ४ शुक्रवार रोजी उत्साहात पार पडल्या.
शहरातील अमर संस्था संचलित लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी अंकिता राधासिंग बारेला व मनीषा कैलास बारेला १७ वर्षा आतील गटात तर चोपड्याच्या बालमोहन विद्यालयातील इयत्ता १२ वी चा विद्यार्थी मंदार विनोद पाटील तर वेले येथील संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वी ची विद्यार्थीनी ललिता जानकीराम बारेला या सर्व विद्यार्थीनी फिल्ड आर्चरी या खेळात विभागीय पातळीवर यश संपादन करून सर्व विद्यार्थीनींनी राज्यस्तरावर निवड झाली आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,सचिव दीपक जोशी, संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी ,बालमोहन विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित,
मुख्याध्यापिका प्रीती सरवैय्या,लिटल हार्ट इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय खैरनार, संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश पाटील यांचेसह आदींना कौतुक केले आहे.क्रिडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना व्ही.आर.पाटील,ललित सोनवणे,अमोल कोळी या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.












