चोपड्यात भारत – पाकिस्तान विभाजन विभिषिका स्मृती दिवस प्रदर्शनाचे आयोजन

*चोपड्यात भारत – पाकिस्तान विभाजन विभिषिका स्मृती दिवस प्रदर्शनाचे आयोजन*
चोपडा प्रतिनिधी


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती कार्यालय , पंकज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी भारत – पाकिस्तान विभाजन विभिषिका स्मृती दिवस प्रदर्शनाचे आयोजन पंकज विद्यालयात करण्यात आले आहे.


पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी एस कोसोदे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत . भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे उत्साहाने – आनंदाने व विविध उपक्रम – कार्यक्रमानी साजरा करीत आहे .त्याच्याच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कार्यालय व पंकज विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारत – पाकिस्तान विभाजन विभिशिका स्मृती दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना भारत – पाकिस्तान फाळणीचा इतिहास माहित व्हावा व सदर प्रदर्शन शहरातील व तालुक्यातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पाहावे असे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व फाळणीच्या इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा असेही नमूद केले.


सदर स्मृती प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सैनिक शांताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, गटशिक्षणअधिकारी डॉ भावना भोसले ,पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More