चोपड्यात उत्कृष्ट क्लस्टर ग्रा पं म्हणून अडावद ला पुरस्कार,आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते महा आवास अभियान पुरस्कार २०२१-२२ वितरण
चोपडा

चोपड्यात उत्कृष्ट क्लस्टर ग्रा पं म्हणून अडावद ला पुरस्कार,
आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते महा आवास अभियान पुरस्कार २०२१-२२ वितरण
चोपडा


घरकुल बांधकाम करणाऱ्या ग्रा प व लाभार्थीना प्रेरणा व घरकुल अभियानाला गती प्राप्त व्हावी यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण,
महा आवास अभियान पुरस्कार २०२२-२३ चे तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण १४ रोजी पंचायत समिती सभागृहात आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यात तालुक्यातील उत्कृष्ट क्लस्टर ग्रा पं म्हणून अडावद ग्रामपंचायतीला आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम नागलवाडी, द्वितीय सनपुले, तृतीय वढोदा तर सर्वोकृष्ट ग्रामपंचायत राज्य योजनेत प्रथम पंचक,द्वितीय कोळंबा,तृतीय हातेड खु ,तालुकास्तरीय सर्वोकृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून प्रथम घोडगाव येथील शरद पंडित पाटील,द्वितीय भारडू कल्याण कृष्णा पाटील, तृतीय मामलदे येथील रमेश गोविंदा पाटील, तालुकास्तरीय सर्वोकृष्ट राज्य घरकुल लाभार्थी म्हणून रामचंद्र सदा कोळी(धानोरा),वसंत दशरथ मोरे(अकुलखेडे), छन्नू सुका लिंगायत(आडगाव) यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


यावेळी युवा शिवसेना प्रमुख गोपाळ चौधरी, माजी सभापती एम व्ही पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील,शिवसेना महिला प्रमुख मंगला पाटील, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जे पी पाटील,आर टी सैंदाने प्रस्तावना गटविकास अधिकारी बी एस कोसोदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार जितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी घरकुल योजनेचे कनिष्ठ सहाय्यक इंजि हेमचंद्र कोळी,डाटा एन्ट्री ऑपरेटर चंद्रकांत बडगुजर, गृहनिर्माण अभियंता धनंजय निनायदे, किरण निनायदे, धनंजय पाटील,स्वप्नील पाटील,तुकाराम बारेला, गौरव भामरे, स्वप्नील भालेराव, परिचर गिरीश पाटील,किशोर सोनवणे,अरुण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More