चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई,१२ गावठी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसांसह जवळपास २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त..#हरियाणा राज्यातील दोन्ही आरोपींना अटक

*चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई,१२ गावठी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसांसह जवळपास २० लाखांचा मुद्देमाल जप्त..**
चोपडा प्रतिनिधी –


शहरातील बस स्थानक परिसरात हरियाणा या राज्यातील दोघांना १२ गावठी बनावटीचे कट्टे व ५ जिंवत काडतुस हे अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जवळपास दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १८ ला सुद्धा अवैध शस्त्रांसंबंधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ६ गावठी कट्टे व ३० जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली होती.

हरियाणा राज्यातील दोन्ही आरोपी


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २२ रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा शहर बस स्थानक परिसरात आरोपी अमीतकुमार धनपत धानिया वय ३० रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, (हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक वय ३२ रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, (हरीयाणा) यांनी विना परवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायदयासाठी २,६०,००० रुपये किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ५००० रुपये किमंतीची ५ पिवळया धातुचे जिवंत काडतुसे हे कोणास तरी विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले म्हणून त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीएनएस भाग ५ गुरनं. ३४८/२०२२
भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतां जवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २,७७,०००/- किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More