प्रा. अ. दा. मोरे यांना पीएचडी प्रदान…

प्रा. अ. दा. मोरे यांना पीएचडी प्रदान…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–


चोपडा येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अरुण दामू मोरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या कडून मराठी या विषयात पी.एच.डी. पदवी बहाल करण्यात आली.त्यांनी “दलित कथाकारांच्या निवडक कथा वाड्.मयाचा : वाड्.मयीन व सामाजिक अभ्यास ” या विषयावर संशोधन केले.त्यांना पी.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील प्रो.डॉ. के. के. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.


त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक पंकज बोरोले, संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे ,नारायण बोरोले ,गोकुळ भोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. आर. आर. अत्तरदे , एम. व्ही.पाटील ,व्ही. आर. पाटील , प्राचार्य मिलिंद पाटील, रेखाताई पाटील यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले.तसेच त्यांच्या या यशासाठी मार्गदर्शक प्रो. डॉ. के. के.अहिरे , प्रो.डॉ. वासुदेव वले, डॉ. सुरवाडे, अविनाश संदानशिव , विवेक संदानशिव , डॉ. मिलिंद बागुल, डॉ. सोनवणे , डॉ.किरण गंगापूरकर, डॉ. व.नि.पाटील, डॉ.आप्पा लोंढे, डॉ. भुसारे , पत्रकार रईस शेख, डॉ. कांबळे ,डॉ. गजानन देवकर, प्रा.आत्माराम गोडबोले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे….

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More