धम्मप्रवर्तक दिनी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पक्षांची विष्टा : संतोष अहिरे संतप्त

धम्मप्रवर्तक दिनी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर
पक्षांची विष्टा : संतोष अहिरे संतप्त

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
चोपडा ( प्रतिनिधी ) – काल विजयादशमीच्या दिनी देशभरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना धम्म परिवर्तक दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली.चोपडा येथे मात्र या पवित्रदिनी नगर पालिका प्रशासनाच्या निद्रिस्त कारभारामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचा प्रकार घडला.चोपड्यातील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पक्षांची विष्टा,पुतळा आवारात घाणीचे झालेले साम्राज्य बघून जनसंघर्ष मोर्चाचे सदस्य संतोषकुमार अहिरे कमालीचे संतप्त झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,काल बौद्धसमाज बांधवांचा धम्मप्रवर्तक दिन होता सालाबादाप्रमाणे सर्व समाज बाबासाहेबांना मानवंदना द्यायला येणार होता,तत्पूर्वी संतोष अहिरे यांनी सकाळी जाऊन पुतळ्याची पाहणी केली असता,पुतळ्यावर पक्षांची विष्टा पडलेली होती,तर न.प.कर्मचाऱ्यांनी झाडझुड करून तो सर्व कचरा,घाण त्याच आवारात लावून ठेवला होता त्यामुळे जनसंघर्ष मोर्चाचे सदस्य संतोष अहिरे संतप्त झाले.

त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांना दूरध्वनी करून सगळा प्रकार कथन करीत रोष व्यक्त केला.आज धम्मप्रवर्तक दिन आहे हे प्रशासनास माहीती असतांना किमान एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी सकाळी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची साफसफाई होणे अपेक्षित असते,मग का केली गेली नाही ?
यामुळे काही अनुचित प्रकार घडावा,किंवा घडला तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल अहिरे यांनी केला.त्यावेळी हेमंत निकम यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन गाडी पाठवून पुतळ्याला स्वच्छ पाण्याने धुवून समाज बांधवांच्या भावनांची दखल घेतली,व यापुढे सर्वच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची काळजी घेतली जाईल असेही सांगीतले.त्यामुळे समाज बांधवांनी समाधान व्यक्त करत महामानवास मानवंदना दिली.जनसंघर्ष मोर्चाचे सदस्य संतोषकुमार अहिरे यांनी दाखवलेला संयम आणि परिपक्वता,समजूतदारपणा यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही यासाठी त्यांचे खास अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More