अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकास अटक…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा तालुक्यांतील मजरेहोळ येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी विलेश दारासिंग पावरा वय – २० रा. महादेव दोंदवाडे ता. शिरपूर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यांतील मजरेहोळ येथील अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून, प्रेमसंबंध जुळवून , लग्नाचे आमिष दाखवून सुमारे दोन महिन्यांपूर्वी गणेश उत्सव दरम्यान ते आज पावेतो आरोपी विलेश दारासिंग पावरा रा. महादेव दोंदवाडे ता. शिरपुर याने पिडीत अल्पवयीन मुलगी वय १६ वर्ष ५ महिने रा. मजरेहोळ ता चोपडा हिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले म्हणुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पिडीत अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना तिचेशी प्रेम संबंध निर्माण करुन पिडीत फिर्यादी हिस लग्न करण्याचे आमिष दाखवुन मजरेहोळ येथुन फिर्यादी राहत असलेल्या घरातुन फिर्यादी यांचे नातेवाईकांचे कायदेशीर रखवालीतुन पळवुन घेवुन गेला व नंतर पिडीत फिर्यादी ही जुगनी ता. धडगांव जि. नंदुरबार येथे व महादेव दोदंवाडे ता शिरपुर येथे आरोपीतासोबत राहत असतांना आरोपी याने पिडीत फिर्यादी हिस लग्नाचे आमिष दाखवुन वेळावेळी शाररीक संबध केले म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस गु. र. न.४३७ / २०२२ भादवि कलम ३६३ ,३६६ अ ,३७६ (१) ,( A) ,२ ( N ) सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४, ८, ५ ( L ) १२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत….













