श्रीरामपूरच्या दोन सराईत
गुन्हेगारांना चोपड्यात ४ गावठी
कट्ट्यांसह घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

श्रीरामपूरच्या दोन सराईत
गुन्हेगारांना चोपड्यात गावठी
कट्ट्यांसह घेतले ताब्यात; स्थानिक
गुन्हे शाखेची कारवाई!


महाराष्ट्र9न्यूज चोपडा (प्रतिनिधी):-


श्रीरामपूरच्या दोन सराईत गुन्हेगारांना चोपड्यात गावठी कट्ट्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एक संशयित आरोपी मात्र, अंधाराचा फायदा घेत पसार झाला.


या संदर्भात अधिक असे की, चोपडा येथे काही गुन्हेगारी वृत्तीची लोक गावठी कट्टा घेण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. याठिकाणी एका कारमध्ये तीन जण संशयितरित्या आढळून आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ४ गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतूस मिळून आहे.

अधिक चौकशी केली असता राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय ३२ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर), गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय २३ रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) व पळून गेलेला आरोपी बबन ऊर्फ रोहित जाधव (रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनर) अशी नावं सांगितली. विशेष म्हणजे या तिघांवर श्रीरामपुर तालुक्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे कळते. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे दिपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर चोपडा शहर पोलीस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५सह भादवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More