पंकज प्राथ.विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा….

पंकज प्राथ.विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा….


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालदिनाचे महत्व आणि चाचा नेहरू यांच्याविषयी विस्तृत माहिती विद्यालयातील शिक्षक आर डी पाटील यांनी दिली.ते आपल्या मनोगतात म्हणाले की, चाचा नेहरू यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.ते स्वदेशीचा नेहमी आग्रह धरीत. त्यांना लहान मुले मनापासून खूप आवडायचे.ते शांतीदूत व आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
विद्यार्थ्यांनी बालगीतांवर ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला.


सदर कार्यक्रम प्रसंगी सी एस जाधव , अनिल पाटील , डी एम जैस्वाल , आर डी पाटील, श्रीमती गायत्री शिंदे, जयश्री पाटील , मनोज अहिरे , प्रशांत पाटील, महेश गुजर , गोपाल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन गायत्री शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More