चोपडा – धरणगाव रस्त्यावर अपघात… एक मृत तर एक जखमी…

चोपडा – धरणगाव रस्त्यावर अपघात… एक मृत तर एक जखमी…


महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा – धरणगांव रस्त्यावर सुतगिरणीच्या अलिकडे फिर्यादी विशाल लिलाधर पाटील रा. पिंप्रीसेकम ता. भुसावळ व मयत जितेंद्र प्रताप पाटील रा एकलग्न ता धरणगांव ह.मु. जळगांव दोघे त्यांचे ताब्यातील टीव्हीएस कंपनीची मोटर सायकल क्रंमाक एम एच 19 डी एक्स 4651 हया गाडीने जळगांव जात असतांना चारचाकी वाहन क्रंमाक एम एच 19 डी व्ही 5231 यावरील चालक नाव गाव माहित नाही याने त्याचे ताब्यातील वाहन चोपडा कडुन धरणगांव कडेस भरधाव वेगात चालवित घेवुन जात असतांना फिर्यादी यांचे ताब्यातील मोटर सायकलला मागुन जोराची ठोस मारुन फिर्यादी यांचा मोटर अपघात करुन सदर अपघातामध्ये जितेंद्र पाटील यांना गंभीर दुखापत होवुन मरण पावला असुन त्याचे मरणास व फिर्यादी यांना झालेल्या गंभीर दुखापतीस व वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झालेला असतांना अपघाताची खबर न देता घटनास्थळावरुन पळुन गेला म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस गु र न 481/2022 भादवि कलम 304 अ,279,337,338,427 मोटार वाहन कायदा कलम 184,134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ प्रदीप राजपूत करीत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More