पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न ; शारीरिक संबंध ठेवून फसवणुक… ग्रामीण पोलिसांत गून्हा दाखल…

पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न ; शारीरिक संबंध ठेवून फसवणुक… ग्रामीण पोलिसांत गून्हा दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:–


चोपडा तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने पहिली पत्नी असताना व तिला ६ अपत्य असताना फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह ७ संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने २०१६ ते २०२१ पर्यंत अत्याचार केला व सतत शारीरिक संबंध ठेवून या ५ वर्षाच्या काळात पीडीतेला ३ अपत्ये झालीत. मात्र आरोपीचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यास पहिल्या पत्नीपासून ६ अपत्ये झाल्याचे लक्षात आल्याने आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याचा आरोप पिडीतेने करीत न्यायालयात धाव घेतली.

घरातील सदस्यांनी पिडीतेस घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याने पीडीतेच्या तक्रारीवरून संजय मुंशी बारेला, मुन्शी भारता बारेला, सनबाई मुन्शी बारेला, कमलेश मुन्शी बारेला, सुशीला कमलेश बारेला, चेतन मुन्शी बारेला, सौ पिंकी संजय बारेला (सर्व रा.बोरअजंटी चोपडा तालुका) यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये चोपडा ग्रामीण पोलिसांत सी सी टी एन एस गु र न ३/२०२३ , सी आर पी सी १५६ ( ३ ) अन्वये भा द वि कलम १२० ब , ३७६ ,३२३ , ४२० , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More